अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, त्याने स्वतः इंस्टाग्राम पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. अर्जुनने स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले असून, त्याला कोणतीही लक्षणे नाहीत.

View this post on Instagram

🙏🏽

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुन कपूरने इंस्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली की, मला कोरोनाची लागण झाली असून, तुम्हाला याची माहिती देणे हे मी माझे कर्तव्य समजतो. मला बरे वाटत असून, कोणतीही लक्षणे नाहीत. डॉक्टरांच्या सल्लानुसार स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे.

अर्जुनने पाठिंबा देण्यासाठी एडवांसमध्ये आभार देखील मानले व मानवता या व्हायरसवर विजय मिळवेल, असा विश्वास देखील व्यक्त केला.

दरम्यान, अर्जुनच्या आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून, बच्चन कुटुंबातील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.