मोदी महान नेते, भारत-चीन सीमावादात मदत करण्यास तयार – ट्रम्प

मागील काही महिन्यात सीमेवर भारत-चीनमधील तणाव वाढला आहे. तणाव कमी करण्याचा प्रयत्न देखील भारताकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत ते आपले चांगले मित्र आहेत व ते चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले की, सध्याच्या काळात चीन असा देश आहे ज्याची चर्चा रशियापेक्षा अधिक होणे गरजेचे आहे. चीन जे काम करत आहे ते खूपच वाईट आहे. पुन्हा एकदा कोरोनाला चीनी व्हायरस असे नाव देत ते म्हणाले की, जगाने पाहिला हवे की चीनने व्हायरसबाबत काय केले. जगभरातील 188 देशांसोबत काय केले, ते पाहायला हवे.

भारत-चीनमधील तणावाच्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले की, ही स्थिती गंभीर आहे. आम्ही भारत आणि चीनच्या मध्यभागी उभे आहोत. जर आम्ही काही करू शकत असल्यास दोघांची मदत करण्यास आम्हाला आनंद होईल. याबाबत त्यांची दोन्ही देशांची चर्चा सुरू आहे.

ट्रम्प म्हणाले की, आम्हाला भारत आणि पंतप्रधान मोदींकडून मोठा पाठिंबा मिळाला. मला वाटते की भारतीय लोक मला मत देतील. कोरोना व्हायरस महामारीच्या आधी देखील मी तेथील लोक विश्वासू असल्याचे म्हटले होते. भारतीयांना एक महान नेता मिळाला आहे, जो महान व्यक्ती देखील आहे.