भारतात लॉकप्रिय असलेली बाईक कंपनी रॉयल एनफिल्ड भारतात आपल्या बाईक्सची नवीन रेंज आणण्याची तयारी करत आहे. कंपनी या वर्षीच्या अखेरपर्यंत 4 नवीन बाईक्स भारतात करण्याची शक्यता आहे.
रॉयल एनफिल्ड भारतात लाँच करणार 4 दमदार बाईक्स
कंपनी 350सीसी सिंगल सिलेंडर इंजिनसह 3 नवीन बाईक भारतात सादर करू शकते. या बाईक सध्या बाजारात असलेल्या क्लासिक आणि थंडरबर्ड रेंजला रिप्लेस करतील. कंपनी नवीन क्लासिक 350 लाँच करणार आहे. याशिवाय Meteor सोबत 350 सीसी क्रूज बाईक (नवीन थंडरबर्ड) देखील लाँच करणार आहे.
350सीसी व्यतिरिक्त कंपनी 650सीसी इंजिन असणारी दमदार बाईक देखील भारतीय बाजारात उतरवण्याची शक्यता आहे. ही बाईक 650सीसीच्या पॉवरफूल ट्विन सिलेंडरसोबत लाँच होईल. याआधी भारतात कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650 बाईक्स लाँच झालेल्या आहेत. कंपनीच्या नवीन 650सीसी बाईकला टेस्टिंग दरम्यान पाहण्यात आले.
650सीसीची नवीन बाईक रॉयल एनफिल्डच्या 650 ट्विनशी मिळती जुळती असेल. ही नवीन बाईक पुर्णपणे वेगळ्या फ्रेममध्ये येऊ शकते. याशिवाय अन्यकाही नवीन बदल देखील पाहण्यास मिळू शकतात. दरम्यान, कंपनीने काही दिवसांपुर्वीच क्लासिक 500 ट्रिब्यून ब्लॅक लिमिटेड एडिशन ब्रिटनमध्ये लाँच केले असून, कंपनी याचे केवळ 1000 यूनिट्स विकणार आहे.