अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींचे भारतीयांबाबत होते तिरस्करणीय विचार, टेपमध्ये धक्कादायक खुलासा

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांचे त्यांच्या कार्यकाळातील काही टेप्स समोर आले असून, यामध्ये ते भारत आणि भारतीयांविषयी आक्षेपार्ह्य भाषेचा वापर करत आहेत. 1971 साली ओव्हल ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी भारतीयांचा मोस्ट सेक्सलेस, दयनीय आणि भारतीय महिलांचा जगातील सर्वात अनाकर्षक असा उल्लेख केल्याचा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.

अमेरिकेत पुढील काही महिन्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, यातच हे टेप्ससमोर आले आहेत. द न्यूयॉर्क टाईम्समध्ये गॅरी जे बास यांनी आपल्या लेखात याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेचे 37 वे राष्ट्रपती असलेले रिचर्ड निक्सन हे 1967 ते 1974 पर्यंत आपल्या पदावर होते. त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर हे देखील भारतीयांवर आपत्तीजनक टिप्पणी करत असल्याचा टेपमध्ये खुलासा झाला आहे.

या टेपममधून 1970 च्या दशकातील भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या स्थितीत निक्सन आणि अमेरिकेचा यांचा दृष्टीकोन काय होता, हे स्पष्ट होते. या टेपमध्ये निक्सन म्हणत आहेत की, जगातील सर्वात अनाकर्षक महिला कोण असतील तर त्या भारतीय महिला आहेत, याबाबत काहीही प्रश्न नाही. लोक कृष्णवर्णीय आफ्रिकन्स विषयी प्रश्न विचारतात. मात्र त्यांच्यात प्राण्यांसारखा आकर्षकपणा तरी आहे. मात्र देवा, हे भारतीय तर दयनीय आहेत. निक्सन यांच्या या विधानावर तेथील उपस्थित अधिकारी हसतात.