रियाचा भाऊ शोविकला 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स हा मोठा अँगल बनला असून, काल नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाला अटक केले होते. आज कोर्टासमोर हजर केल्यानंतर दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली आहे.

एनसीबीकडून 7 दिवस कोठडीची मागण्यात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र न्यायालयाने दोघांना 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे. याशिवाय कैजानाला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी पाठविण्यात आले आहे.

मागील अनेक दिवसांपासून एनसीबी तासंतास शोविकची चौकशी करत होते. शोविक आणि सुशांतचा हाउस मॅनेजर असलेल्या सॅम्युअल मिरांडाचे ड्रग पॅडलरसोबत कनेक्शन असल्याचे समोर आले होते. व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून देखील याचा खुलासा झाला होता. पुराव्यांच्या आधारावर शोविकच्या घरी छापा देखील टाकण्यात आला होता. छापेमारीत काहीही सापडले नव्हते, मात्र शोविकला अटक करण्यात आले होते.