पुर्व लडाखमधील पेंगोंग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रमुख टेकड्यांवर भारतीय सैन्याच्या जवानांना ताबा मिळवल्यानंतर आता इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) कमीत कमी 30 जवानांना आणखी एक महत्त्वपुर्ण ठिकाण आपल्या ताब्यात घेतले आहे. आयटीबीपीच्या जवानांनी महत्त्वपुर्ण भाग असलेल्या ब्लॅक टॉपजवळील अनेक ठिकाण ताब्यात घेतली आहे. येथून चीनी सैन्याच्या एलएसीवरील हालचालींवर स्पष्ट लक्ष राहील.
चीनला मोठा झटका, आयटीबीपीचा ‘ब्लॅक टॉप’वर ताबा
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, आयटीबीपीचे जवान फुरचूक ला पास येथून ब्लॅक टॉपर्यंत पोहचले. फुरचूक ला पास 4994 मीटर उंचीवर आहे. आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांना पेंगोंग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर 2 आणि फिंगर 3 या भागात धान सिंह पोस्टवर तैनात केले जात असे.
आयटीबीपीचे आयजी (ऑपरेशन्स) एम.एस. रावत म्हणाले की, आयटीबीपीचे डीजीपी एसएस देसवाल यांनी मागील आठवड्यात जवानांना एलएसीवरील जबाबदाऱ्यांबाबत सतर्क केले. पीएलएच्या पोस्टवरील टेकड्या रिकाम्या होत्या आणि त्यावर कोणाताचाही ताबा नव्हता. आता आपल्या सैनिकांनी भारतीय सीमेची तटबंदी केली आहे.
आता भारतीय जवानांनी हेलमेट टॉप, ब्लॅक टॉप आणि येलो बंपवर तटबंदी केली असून, या ठिकाणांवरून चीनी सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.