आरोग्य विमा खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, इरडाने जारी केले नवीन नियम

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) वेलनेस आणि प्रिव्हेटिव्ह फीचर्ससाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कंपन्या ग्राहकांना हेल्थ सप्लीमेंट्स आणि आणि योग केंद्रांसाठी डिस्काउंट कूपन, वाउटर देखील देऊ शकणार आहेत. याशिवाय विमाधारकांना मानदंडांचे पालन केल्यास रिवॉर्ड पॉइंट्स देखील मिळतील. या नवीन नियमांमुळे विमाधारकांना फायदा होणार आहे.

इरडाच्या नवीन नियमांनुसार, विमा कंपन्या विमाधारकांसाठी आरोग्य सप्लीमेंट खरेदी करू शकतील. यासोबत ग्राहकांना विम्यासोबत जिम, योग केंद्र, स्पोर्ट्स क्लब आणि फिटनेस सेंटरची सदस्यता घेण्यासाठी डिस्काउंट कूपन किंवा वाउचर देतील. यामुळे ग्राहक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागृक होतील.

नियमांनुसार, हे फीचर कोणत्याही विम्यात पर्यायी स्वरूपात अतिरिक्त म्हणून समावेश करता येईल. सोबतच स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणत्याही विम्यात या सुविधा अतिरिक्त लाभ म्हणून समाविष्ट करता येणार नाही. इरडाने विमा कंपन्यांना या फीचरमुळे विम्याच्या किंमतीवर होणाऱ्या परिणामाबाबत ग्राहकांना स्पष्टपणे माहिती देण्यास सांगितले आहे. विमा कंपन्यांना पॉलिसी रिन्यूवलच्यावेळी प्रिमियमवर डिस्काउंस आणि सम-एश्योर्डमध्ये वाढ देण्याची देखील परवानगी दिली आहे.

आता विमा कंपन्यांना आपल्या जाहिरातीत तिसऱ्या पक्षाचे नाव अथवा लोगो वापरण्यास नकार देण्यात आलेला आहे. मात्र कंपन्या सामान्यरित्या सेवांचा उल्लेख करू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही