साबणामध्ये लपवले होते तब्बल 38 लाखांचे सोने, विमानतळावर अशी झाली पोलखोल

विमानतळावर अनेक सोने तस्करीच्या घटना समोर येत असतात. आरोपी शक्कल लढवून हे सोने बेकायदेशीर मार्गाने आणण्याचा प्रयत्न करतात. असाच एक सोने तस्करीचा तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तस्कराने चक्क साबणात सोने लपवले असल्याचे सांगितले जात आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत जवळपास 38 लाख रुपये आहे.

ट्विटर यूजर फैजान हैदरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 38 लाखांचा साबण तिरुचिरापल्ली विमानतळावर जप्त करण्यात आला.

विमानतळावर संशयास्पद वाटल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या तस्कराला पकडले. तपासणी केली असता साबणात तब्बल 38 लाखांचे सोने लपवले असल्याचे आढळले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की कशाप्रकारे साबणाला पॅक केलेले आहे व त्यात एका छोट्याशा पाकिटात हे सोने लपवलेले आहे.