मुंबई-नाशिकमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

राज्यात मागील 12 तासात 3 वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. नाशिकमध्ये रात्री जवळपास 12 वाजता दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले तर मुंबईमध्ये एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. आज सकाळी 6.36 मिनिटांनी मुंबईपासून 98 किमी उत्तरेला 2.7 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. नाशिकमध्ये याची तीव्रता अधिक होती.

नाशिकमध्ये शुक्रवारी रात्री 11.41 मिनिटांनी 4 रिक्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर 12.05 मिनिटांनी 3.6 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपाच्या झटक्यात कोणतेही नुकसान झाले नाही.

मागील महिन्यातच पालघर येथे देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र हे धक्के जास्त तीव्रतेचे नसल्याने याचे परिमाण जाणवले नाहीत.