दरवर्षी 5 सप्टेंबरला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून देशात शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर मार्गदर्शक म्हणून जी व्यक्ती उभी राहते ती म्हणजे शिक्षक. याच शिक्षकांचा सन्मान करण्याचा हा दिवस. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज एका अशा शिक्षिकेबद्दल जाणून घेऊया ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यूपीएससी पास केली होती.
प्राथमिक शाळेत शिक्षिका राहिलेल्या सीरत फातिमा यांनी काम करत असतानाच मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पास केली होती. वर्ष 2017 मध्ये त्यांनी 810 रँक मिळवली होती. सध्या ते इंडियन रेल्वे अँड ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये कार्यरत आहेत. त्या मूळच्या उत्तर प्रदेशमधील इलाहाबाद येथील आहे. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी शिक्षिका म्हणून केली होती. सीरत यांचे वडील अब्दुल गनी सिद्दीका एका सरकारी कार्यालयात अकाउंट म्हणून काम करत असे. लहानपणीच त्यांनी मुलीला आयएएस बनवयाचे ठरवले होते.

मुलीला यूपीएससीची तयार करण्यास सांगणे सीरतच्या वडिलांसाठी सोपे काम नव्हते. घर चालविण्यासाठी पुरेसे पैसे नसतानाही त्यांनी अभ्यासाचा पाया मजबूत व्हावा यासाठी सीरतला सेंट मेरी कॉन्वेंट स्कूलमध्ये घातले. 12वी नंतर सीरत यांनी अलाहाबाद सेंट्रल यूनिव्हर्सिटीमधून बीएससी आणि बीएडची डिग्री घेतली. त्यानंतर त्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लाल्या.

शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 38 किमी प्रवास करावा लागत असे. आधी बसने 30 किमी आणि त्यानंतर 8 किमी पायी असा त्या रोज प्रवास करत असे. मात्रसोबतच त्यांनी अधिकारी बनण्याची गाठ देखील आपल्या मनाशी बांधली होती. नोकरी करताना त्यांना अभ्यासासाठी खूप कमी वेळ मिळत असे. त्यांनी 3 वेळा प्रयत्न करूनही अपयश आले. अखेर घरच्यांकडून लग्नासाठी दबाव वाढू लागल्याने त्यांनी लग्नाला होकार दिला.
लग्नानंतर जबाबदाऱ्या आणखीनच वाढल्या. मात्र असे असले तरी त्यांच्या अधिकारी बनण्याचे स्वप्न कायम होते. मांझी-द माउंटनमॅन या चित्रपटाकडून देखील त्यांना प्रेरणा मिळेल. आपल्या प्रवासात त्या नोट्स वाचत असे. अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. मुलीच्या या यशाने त्यांच्या वडिलांना देखील अभिमान वाटला.