व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केली नवीन वेबसाईट, सुरक्षा त्रुटींबाबत मिळणार माहिती

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजरच्या सुरक्षेसाठी नवनवीन अपडेट आणत असते. आता व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन पोर्टल लाँच केले असून, यावर सिक्यूरिटी अपडेट मिळेल. सोबतच 6 त्रुटींबाबत माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या त्रुटींबाबत युजर्स या नवीन वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकतील.

व्हॉट्सअ‍ॅपने या वेबसाईटवर आपल्या प्लॅटफॉर्म आढळलेल्या 6 त्रुटींबाबत माहिती दिली आहे. मात्र या सुरक्षा त्रुटींना कंपनीने ठीक केले आहे. 6 पैकी 5 त्रुटी एकाच दिवसात ठीक करण्यात आल्या होत्या. सोबतच कंपनीने म्हटले आहे की याचा फायदा हॅकर्सला झाला असल्याचे देखील कोणतेही पुरावे नाहीत.

जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे जवळपास 2 अब्जपेक्षा अधिक युजर्स आहेत. दर काही दिवसांनी अ‍ॅपमध्ये काहीना काही त्रुटी आढळत असते. कंपनीचे म्हणणे आहे की व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी सुरक्षा त्रुटींची माहिती मिळावी यासाठी एका केंद्रीय स्थानाची मागणी करत होते. व्हॉट्सअ‍ॅपने जी नवीन वेबसाईट तयार केली आहे. त्यावर दर महिन्याला माहिती अपडेट केली जाईल. कोणत्याही त्रुटीबाबत कंपनी याद्वारे युजर्सपर्यंत माहिती पोहचवेल.

https://www.whatsapp.com/security/advisories या वेबपेजला भेट देऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. या वेबपेजवर 2018 पर्यंतच्या सुरक्षा त्रुटींबाबत माहिती देण्यात आलेली आहे.