तैवानने पाडले चीनचे लढाऊ विमान?, व्हायरल व्हिडीओवर तैवानचे स्पष्टीकरण

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तैवानने चीनचे लढाऊ विमान सुखोई-35 पाडल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या देशाच्या हवाई हद्दीत घुसल्याने तैवानने हे विमान पाडल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे विमान पाडण्यासाठी अमेरिकन पेट्रियाट मिसाइल डिफेंस सिस्टमचा वापर करण्यात आला. मात्र ही माहिती समोर आल्यानंतर आता तैवानने आपण चीनचे विमान पाडले नसल्याचे स्पष्ट करत अशी कोणतीही कारवाई केली नसल्याचे म्हटले आहे.

रिपोर्टनुसार, चीनी विमानाला अनेकदा चेतावणी देण्यात आली, मात्र तरीही विमान तैवानच्या हवाई हद्दीत अनेक वेळ होते. यानंतर तैवानने कारवाई करत हे लढाऊ विमान पाडले. या घटनेत पायलट जखमी झाल्याचे देखील सांगितले जात आहे.

असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, याप्रकारची माहिती खोटी असून, लोकांची दिशाभूल करण्यासाठी असे केले जात आहे.

जर ही घटना खरी असल्यास, दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते. चीन मागील अनेक दिवसांपासून तैवानच्या हवाई हद्दीत आपली विमाने पाठवत आहे. चीनच्या आक्रमक धोरणाला उत्तर देण्यासाठी तैवानने लष्कर आणि नौदलाला अलर्ट केले आहे.