रशियाची कोरोना लस सुरक्षित, जगातील सर्वात विश्वासार्ह्य मेडिकल जर्नलचा दावा

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर सर्वात प्रथम लस शोधल्याचा दावा रशियाने केला होता. रशियाने या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल आणि उत्पादन देखील सुरू केले आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी या लसीवर अविश्वास दाखवला आहे. यातच आता जगातील सर्वात विश्वासार्ह्य मेडिकल जर्नल पैकी एक असलेल्या लँसेट जर्नलने रशियाची लस सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

लँसेट जर्नलनुसार, रशियाद्वारे तयार करण्यात आलेली स्पुटनिक-व्ही लसीची ज्या रुग्णांवर चाचणी करण्यात आली, त्यांच्यावर कोणतेही वाईट परिणाम दिसले नाहीत. मात्र ही चाचणी खूपच कमी लोकांवर करण्यात आलेली आहे.

लँसेटच्या अभ्यासानुसार, रशियाच्या संशोधकांनी 2 छोटे ट्रायल केले. याच्या प्रत्येक ट्रायलमध्ये 16 ते 60 वर्ष वयोगटातील 38 निरोगी लोक सहभागी झाली होती. या स्वयंसेवकांना दोन टप्प्यात लस देण्यात आली. प्रत्येकाला पहिल्या टप्प्यात कोरोनाचा एक डोस देण्यात आला. त्यानंतर दुसरा डोस 21 दिवसांनी दिला. या सर्वांवर 42 दिवस लक्ष ठेवण्यात आले. 3 आठवड्यांच्या आत त्यांच्यात अँटीबॉडीज तयार झाल्या.