अरेच्चा! चक्क लाखो रुपयांना विकले गेले हे 4 पाने असलेले दुर्मिळ रोपटे

तुमच्याकडे 4 लाख रुपये असतील तर तुम्ही त्या पैशातून एखादी कार विकत घेऊ शकता, किंवा बाहेर कोठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही न्यूझीलंडमध्ये 4 लाख रुपयांमध्ये 4 पानांचे एक छोटे रोपटे खरेदी करण्यात आले आहे. या दुर्मिळ रोपट्याला रफिडोफोरा टेट्रास्पर्मा (Variegated Rhaphidophora Tetrasperma) किंवा फिलोडेंड्रोन मिनिमा (Philodendron Minima) नावाने ओळखले जाते. याच्या प्रत्येक पानावर पिवळा रंग असतो.

ट्रेड मी या लिलाव करणाऱ्या वेबसाईटवर या रोपट्यासाठी बोली लावण्यात आली. या दुर्मिळ रोपट्यासाठी खरेदीदाराने 8,150 न्यूझीलंड डॉलर्स (जवळपास 4 लाख रुपये) मोजले. साईटवर रोपट्याची विक्री करणाऱ्याने लिहिले होते की, या रोपट्याच्या प्रत्येक पानावर पिवळा रंग आहे.

इतर झाडांच्या तुलनेत ही रोपटी दुर्मिळ आणि हळूवार वाढतात. ते कदाचितच नैसर्गिकरित्या उगवतात. अशा रोपट्यांची कलेक्टर्सकडे मोठी मागणी असते. या रोपट्याविषयी माहिती देताना न्यूझीलंड गार्डनरच्या संपादक जो मॅक्करोल यांनी सांगितले की, झाडांमधील हिरवी पाने प्रकाश संश्लेषण होऊ देतात. तर कमी हिरवे आणि कमी पृष्ठभाग असलेली पाने वाढ आणि दुरुस्तीसाठी त्यांना आवश्यक असलेले साखर तयार करतात.

त्यांनी सांगितले की, हिरव्या रंगाचे देठ असलेले विविध रंगाच्या पानांची भविष्यात कशी वाढ होईल हे सांगता येत नाही. मात्र मला वाटते की हे रोपटे खरेदी करणाऱ्याला याविषयी भरपूर ज्ञान असावे. कदाचित पैसे कमविण्यासाठी ती व्यक्ती हे रोपटे पुढे विकेल देखील.