BS-6 इंजिनसह लाँच झाली शानदार महिंद्रा XUV500 ऑटोमॅटिक

महिंद्रा अँड महिंद्राने बीएस6 इंजिनसह XUV500 च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंट्सच्या किंमतीची माहिती आपल्या वेबसाईटवर शेअर केली आहे. बीएस6 महिंद्रा XUV500 एटी रेंजची एक्स-शोरुम किंमत 16.07 लाख रुपये असून, ही किंमत डब्ल्यू7 व्हेरिएंटची आहे. डब्ल्यू9 व्हेरिएंटची किंमत 17.78 लाख आणि टॉप मॉडेल डब्ल्यू11-ओ ची किंमत 19.30 लाख रुपये आहे. मॅन्युअल व्हेरिएंटशी तुलना केल्यास, ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 1.23 लाख रुपये जास्त आहे. बीएस-6 इंजिनच्या नियमांमुळे XUV500 ला एप्रिल महिन्यात बंद करण्यात आले होते. मात्र आता या एसयूव्हीला 6-स्पीड टॉर्क कन्वर्टर ट्रांसमिशनसोबत सादर करण्यात आलेले आहे.

Image Credited – NorJoe

महिंद्रा XUV500 मध्ये आईसिनमधून घेतलेले ऑटोमॅटिक ट्रांसमिशन क्रीप फंक्शन येते. ज्यामुळे शहरातील रस्त्यांवर गाडी चालविण्यास सोपे जाते. ही एसयूव्ही 2.2 लीटर एमहॉक डिझेल इंजिनसोबत येते. जे 153 बीएचपी पॉवर आणि 360 एनएम पीक टॉर्कन निर्माण करते. कंपनीने हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत दिले आहे. कारचे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक फीचर्स एकसारखेच आहेत. ज्यात इलेक्ट्रिक सनरूफ, क्ट्रिक एडजस्टेबल ड्रायव्हर सीट, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसोबत अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, व्हिकल टेलिमेटिक्स सारखे अनेक फीचर्स आहेत.

Image Credited – Autocar India

कंपनीने XUV500 ऑटोमॅटिकमध्ये कोणतेही कॉस्मेटिक बदल केलेले नाहीत. कारच्या बाहेरील बाजूला याची ओळखीसाठी बॅच दिलेला आहे. तर आतील भागात नवीन गिअरशिफ्ट नॉब देण्यात आलेला आहे. जो सामान्य एच-पॅटर्नपेक्षा वेगळा आहे.

भारत बाजारात XUV500 ऑटोमॅटिक टाटा हॅरियर, जीप कंपस, एमजी हेक्टर आणि टोयोटा इनोव्हा क्रिस्टाशी होईल. कंपनीने XUV500 ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाटी बुकिंग सुरू केले आहे. मात्र सध्या या एसयूव्हीचे काम अंतिम टप्प्यात असून, यावर्षी फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.