व्हिडीओ : लवकरच पुर्ण होणार फ्लाईंग कारचे स्वप्न , जपानमध्ये चाचणी यशस्वी

सध्या फ्लाइंग कार बनविण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत आहे. या प्रयत्नात जपानी इंजिनिअरिंग कंपनी स्कायड्राईव्हला काही प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे. कंपनीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कारसारखे असलेले एक वाहन व्यक्ती चालवत आहे. याची खास गोष्ट म्हणजे या कारला कॉम्पॅक्ट प्रोपेलेर्स देण्यात आलेले आहेत, ज्याच्या मदतीने हे वाहन एक फ्लाइंग कार बनते.

कंपनीचा दावा आहे की हे जपानमधील पहिले हवाई कारचे प्रदर्शन आहे. पाहिला गेले तर हे एकप्रकारे 2 कारच्या आकाराचे विमान आहे. व्हिडीओमध्ये कार जवळपास 4 मिनिटे हवेत उड्डाण घेते. कंपनीचे सीईओ टोमोहिरो फुकूझावा म्हणाले की, आम्हाला सांगायचे आहे की फ्लाईंग कार या आकाशातून प्रवास करण्यास शक्य आणि सोयीस्कर आहे.

कंपनीनुसार, वर्ष 2023 मध्ये जपानमध्ये ही फ्लाईंग कार ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. रिपोर्टनुसार या कारची किंमत 3 लाख डॉलर्सपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

फ्लाईंग कार बनविणारी स्कायड्राईव्ह की काही पहिलीच कंपनी नाही. मागील वर्षी जर्मनीची स्टार्टअप कंपनी वोलोकॉप्टरने देखील सिंगापूरमध्ये फ्लाईंग टॅक्सीचा डेमो दाखवला होता. याशिवाय बोइंग, उबर आणि एअरबस देखील असेच उत्पादन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.