युजवेंद्रची होणाऱ्या पत्नीसोबत ‘रसोडे मे’ वर भन्नाट मस्ती, व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. मजेशीर व्हिडीओ आणि मीम्स शेअर करत आपल्या फॉलोअर्सचे मनोरंजन चहल करतो. आता युजवेंद्रने आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत ‘रसोड़े में कौन था?’ वर परफॉर्म केला आहे. याचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये युजवेंद्र ‘कोकीला बेन’ बनला आहे, तर त्याची होणारी पत्नी धनश्री ‘गोपी बहू’ बनली आहे. युजर्सला व्हिडीओमधील दोंघाचे एक्सप्रेशन प्रचंड आवडत आहेत.

व्हिडीओ शेअर करत चहलने लिहिले की, आता आमचा टर्न आहे. धनश्री सांग सोड़े में कौन था? आम्ही कसे सिंक केले. या पोस्टवर कमेंट करताना धनश्रीने लिहिले की, हे खरचं हैराण करणारे होते. मी हा व्हिडीओ वारंवार पाहू शकते. तु चांगले केले चहल.

सोशल मीडियावर युजर्सला हा व्हिडीओ आवडत असून, लाखो युजर्सनी आतापर्यंत व्हिडीओला पाहिले आहे.