मोदी जेवढे तास झोपतात, तेवढा वेळ तरी उद्धव ठाकरेंनी काम करावे – अतुल भातखळकर


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत सारखीच असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याने टीका करणाऱ्यांना एका जागेवरून ते यंत्रणांवर लक्ष ठेवत असल्याचे सांगत उत्तर दिले. दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरुन नरेंद्र मोदी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी उद्धव ठाकरेंनी काम करावे, असा टोला लगावला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून ते आपल्या ट्विटमध्ये कार्यकारी उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे. उद्धवजीना एकच विनंती मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असे सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही सागण्याचे धाडस करावे, असे केले आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत एकसारखीच आहे. एका जागेवरून ते यंत्रणेवर लक्ष ठेवत आहेत. प्रादुर्भाव ज्या प्रकारे वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले, तर गर्दी होते. प्रोटोकॉल जर पंतप्रधान, राष्ट्रपती तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचे भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.