फक्त रणबीर अन् रणवीरच नव्हे, तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग्स टेस्ट करा - निलेश राणे - Majha Paper

फक्त रणबीर अन् रणवीरच नव्हे, तर आदित्य ठाकरेंचीही ड्रग्स टेस्ट करा – निलेश राणे


मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या तपास दरम्यान ड्रग्स कनेक्शनही उघड झाल्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्सचा संबंध पुन्हा ऐरणीवर आला आहे. बॉलिवूड स्टार कंगना राणावतने या प्रकरणी उघडपणे बोलताना थेट बॉलिवूडच्या ४ स्टार्सची नावे घेतली होती. यात रणवीर सिंग, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांची ब्लड टेस्ट करावी, असे म्हटले होते.

यावरुन आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. केवळ रणवीर अथवा रणबीरच नव्हे तर आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची चाचणी करावी, कारण बॉलिवूडच्या सर्कलमध्ये आदित्य ठाकरेंचा वावर असल्याचे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.