व्हाईट हाऊसच्या माजी प्रेस सेक्रेटरीचा धक्कादायक खुलासा; किम जोंगने केला होता माझ्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न


उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनबद्दल व्हाईट हाऊसच्या माजी प्रेस सेक्रेटरीने एक धक्कादायक खुलासा केला असून आपल्या नवीन पुस्तकात माजी प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी सांगितले आहे की, एकदा माझ्याशी फ्लर्ट करण्याचा किम जोंग उनने प्रयत्न केला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जून २०१८ मध्ये सिंगापूर समिटला गेले होते, सारा तेव्हा त्यांच्यासोबत होती. साराच्या म्हणण्यानुसार त्यावेळी तिला किम जोंग उनने डोळा मारला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना जेव्हा याबद्दल नंतर साराने सांगितले, तेव्हा तिची ट्रम्प यांनीही थट्टा केली. ट्रम्प हसून म्हणाले, तुझ्याशी फ्लर्ट करण्याचा किम जोंगने प्रयत्न केला, तुझ्यावर त्याने लाईन मारली. साराला ट्रम्प यांनी गंमतीत सांगितले की, आता आमच्या फायद्यासाठी तू उत्तर कोरियाला जात आहेस.

द गार्डियनच्या अहवालानुसार, पुढील आठवड्याच्या मंगळवारी सारा सँडर्सचे पुस्तक स्पीकिंग फॉर माय सेल्फी प्रसिद्ध होणार आहे. गार्डियनकडे या पुस्तकाची एक प्रत आहे. सारा सँडर्स रिपब्लिकन पार्टीशी संबंधित असलेल्या कुटुंबातील एक असून २००८ आणि २०१६ मध्ये त्यांचे वडील माइक हकाबी हे अध्यक्षपदासाठी उभे राहिले होते. सध्या अरकानाकसमधील राज्यपालांच्या शर्यतीवर त्यांचे लक्ष आहे.

रिपोर्टनुसार किम जोंग उन यांच्यासह सिंगापूर समिटचा उल्लेख साराने केला आहे. आपल्या सुरक्षिततेबद्दल किम खूप सावध आहे आणि इतर कोणताही नेता किंवा व्यक्तीपेक्षा लवकर काहीही स्वीकारत नाही. किमला ट्रम्प यांनी विश्वास दिला होता की, ती फक्त ब्रीद मिंट आहे आणि विषारी कॅप्सूल नाही.

स्पोर्ट्स, विशेषत: महिला सॉकरबद्दल किम जोंग उन आणि ट्रम्प यांच्यात संभाषण झाले. सारा यांनी लिहिले आहे की, किमला अचानक तिने तिच्याकडे एकटक बघताना पाहिले. एकमेकांवर आमचे डोळे लागले होते. तितक्यात मला किमने डोळा मारला, तेव्हा मला धक्का बसला. मी ताबडतोब खाली पाहिले आणि नोट्स घेत राहिले. आता काय झाले आहे? याचाच मी विचार करत बसले.

साराने किम जोंग-उन यांची भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांना विमानतळाकडे जात असताना बीस्ट कारमध्ये बसून घटनेची माहिती दिल्यानंतर ट्रम्प यांनी आश्चर्याने सांगितले की, तुझ्यावर त्याने लाईन मारली. या सर्व गोष्टी आपण गंमतीने सांगितल्या नव्हत्या. त्यानंतर ही चर्चा थांबवण्यास त्यांनी सांगितले. ट्रम्प विनोदाने म्हणाले की, मग आता बरे झाले, तू आमच्यासाठी उत्तर कोरियाला जात आहेस. तुझा नवरा आणि मुले तुझी आठवण काढतील, पण आपल्या देशासाठी तू नायक होशील. त्यानंतर ट्रम्प जोरजोरात हसायला लागले.

किम जोंग यांची ट्रम्प यांनी तीन वेळा सिंगापूर, हनोई आणि उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामधील डिमिलीटरायझेशन झोनमध्ये भेट घेतली आहे. सर्व प्रयत्न करूनही किमला अण्वस्त्रांवरील त्यांचा आग्रह सोडण्यास ट्रम्प भाग पाडू शकले नाहीत. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणात आर्सेनल प्योंगयांगने गोळा केले आहे. किमबरोबर झालेल्या चर्चेमुळे दक्षिण कोरियासारख्या प्रमुख मित्रांशी संबंध तोडले गेल्याची टीकाही ट्रम्प यांच्यावर करण्यात येते.

आपल्या संस्मरणात साराने सांगितलेल्या अनुभवाचा उल्लेख ट्रम्प प्रशासनात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले जॉन बोल्टन यांनी केला नाही. तथापि, त्यांनी लिहिले होते की किम जोंगशी क्रीडा विषयावर ट्रम्प यांनी संवाद साधला आणि एक मिंट खाण्यास दिली. ट्रम्प यांचे सहकारी त्यांना किमबरोबर एकटे सोडू इच्छित नव्हते, कारण हानीकारक करारास ट्रम्प संमती देतील, अशी भीती त्यांना असल्याचे जॉन बोल्टन यांनी सांगितले.