‘बिग बॉस’च्या नव्या पर्वासाठी सलमान घेणार तब्बल 450 कोटी मानधन!


छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि तेवढाच वादग्रस्त शो असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन या शोच्या सुरुवातीपासूनच भाईजान सलमान खान करत आहे. त्यामुळे शोबाबत चाहत्यांमध्ये देखील उत्सकुता पाहायला मिळते. त्यातच आता बिग बॉसच्या १४ व्या पर्वाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. पण यंदाच्या पर्वात थोडे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. अशातच सलमान शोचे सुत्रसंचालन करण्यासाठी किती मानधन घेणार असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान बिग बॉसच्या 14 व्या पर्वासाठी 450 कोटी रुपये मानधन घेणार आहे. होय, हे खरे आहे, बिग बॉसच्या संपूर्ण हंगामासाठी सलमान खान एवढे मानधन घेणार आहे. त्यानुसार सलमानला एका शोच्या एका भागासाठी तब्बल 20 कोटी रुपये मिळतील. याची माहिती खुद्द सलमानने जरी दिली नसली तरी परंतु ट्विटर हँडलवरील एक ट्विटमुळे याची पुष्टी झाली आहे. गेल्या हंगामातही बर्‍याच बातम्या बातम्यांमधून समोर आल्या. यावेळीही सलमानच्या मानधनाबाबत हा सनसनाटी खुलासा झाला आहे. यासंदर्भातील वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले आहे.

तत्पूर्वी बिग बॉसच्या १४ व्या पर्वासाठी सलमान खान जवळपास २५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शोच्या फॉर्मेटमध्ये काही तरी वेगळे पाहायला मिळणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणास कोरोनाच्या पार्श्वभूमिवर परवानगी देण्यात आली. तरी त्यासाठी काही नियम व अटी तयार करण्यात आल्यामुळे बिग बॉसचे चित्रीकरण या नियमांचे पालन करत सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.