मंदिरे उघडण्यावरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना संतप्त सवाल


मुंबई – सध्या काही बाबतीतील महाविकास आघाडी सरकारचे धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारे असून कुठल्या गुंगीची झापड या सरकारच्या डोळ्यावर आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नसल्याचे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

यासंबंधी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी विचारणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधील निर्बंध राज्य सरकारकडून शिथील करण्यात येत आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला २ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पण अद्याप कोणताही निर्णय मंदिरे खुली करण्यासंबंधी घेण्यात आलेला नाही.

राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटले आहे?