आतापर्यंत बचत आणि लिलावातून मिळालेले इतके कोटी मोदींनी केले दान

कोरोना व्हायरस संकटाच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पीएम केअर्स फंडची सुरुवात करण्यात आली होती. या फंडच्या ऑडिटेड अकाउंटमध्ये पहिले दान 2.25 लाख रुपये आल्याचे दाखविण्यात आलेले आहे. न्यूज18 च्या वृत्तानुसार पीएम केअर्स फंडमध्ये पंतप्रधान मोदींनीच या फंडमध्ये सव्वा दोन लाख रुपये जमा करत सुरुवात केली होती. यानंतर अवघ्या 5 दिवसात या फंडमध्ये जवळपास 3100 कोटी रुपये जमा झाले होते.

केवळ पीएम केअर्स फंडच नाही, तर आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा दान केले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी, नमामी गंगेपासून ते शोषित-वंचित समाजासाठी देखील मोदींनी मदतीचा हात अनेकवेळा पुढे केला आहे. मुख्यमंत्री असल्यापासून ते आतापर्यंत आपल्या बचतीमधून 103 कोटी रुपये दान केले आहेत.

2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या वैयक्तिक बचतीमधून 21 लाख रुपये कुंभ मेळ्यात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलल्या फंडमध्ये दान केले होते. सिओल शांती पुरस्कार मिळाला त्यावेळी देखील मोदींनी 1.3 कोटी रुपये दान केले होते. वस्तूंचा लिलाव करून मिळालेल्या रक्कमेच्या 3.40 कोटी रुपये त्यांनी नमामी गंगेसाठी दान केले होते.

2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री म्हणून आपले पद सोडले, त्यावेळी आपल्या पगारातून बचत केलेले 21 लाख रुपये त्यांनी गुजरात सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी सहाय्यता म्हणून दिले होते. मुख्यमंत्री असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून जमा झालेला 89.96 कोटी रुपयांचा निधी त्यांनी कन्या केलावानी फंडमध्ये दान केला होता. आतापर्यंत मोदींनी जवळपास 103 कोटी रुपये दान केले आहेत.