निलेश राणेंनी कंगनाला सुनावले; आमच्या पोलिसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही


मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घेण्यास नकार देत, मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे म्हटले होते. यावरुन आता तिला माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत सुनावले आहे. निलेश राणेंनी आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हटले आहे.

निलेश राणेंनी याबाबत ट्विट करत, 2/3 अधिकारी प्रेशरमध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणौत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.