व्हिडीओ : वेगाचा बादशाह! या इलेक्ट्रिक कारने टेस्लाच्या मॉडेललाही पछाडले

काही दिवसांपुर्वी सर्वात फास्ट चार्जिंग होणारी इलेक्ट्रिक कार म्हणून चर्चेत आलेली लूसिड एअर पुन्हा एकदा चर्चेत आहे. लूसिड एअरने क्वार्टर मैल (400 मीटर) शर्यतीमध्ये टेस्लाच्या एस मॉडेलला पछाडले आहे. लूसिड एअरने अवघ्या 9.9 सेंकदात हे अंतर पार करत टेस्लाच्या एस मॉडेलला मागे टाकले. याचा एक व्हिडीओ देखील कंपनी शेअर केला आहे.

कंपनीने याविषयी माहिती देताना सांगितले की, ड्युअल मोटरसह 1,080 हॉर्स पॉवर, ऑल-व्हिल ड्राईव्ह पॅकेज असलेल्या लूसिड एअर ड्रीम एडिशनने अवघ्या 9.9 सेंकदात क्वार्टर मैल अंतर पुर्ण केले. जगातील वेगवान उत्पादन असलेल्या या सेडानमध्ये लग्झरी पॅकेज, 5 जणांसाठी जागा आणि क्लास-लिडिंग डिझाईन व भरपूर स्टोरेज स्पेस मिळेल.

लूसिड एअर इलेक्ट्रिक सेडान पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या कारविषयी मागील अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ही कार सिंगल चार्जिंगमध्ये 832 किमी अंतर पार करेल, जे टेस्ला मॉडेल एस पेक्षाही अधिक चांगले आहे.

लूसिड पॉवरट्रेनची खास गोष्ट म्हणजे याचे प्रत्येक प्रत्येक पॉवर मोटर पॅकेज 650एचपी पॉवर आणि 20000 आरपीएम देते व याचे वजन केवळ 74 किली आहे. त्यामुळे हे सहज स्टँडर्ड एअरोप्लेन कॅरी-ऑन बॅगमध्ये बसू शकते. कार अवघ्या 20 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 500 किमी अंतर पार करू शकते, असाही दावा कंपनीने केलेला आहे.