खुशखबर! विमानाचे तिकिट रद्द केल्यावर मिळणार 5 हजार रुपये

लिबर्टी जनरल इंश्योरेंस कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने फ्लिपकार्टवरून विमान तिकिट करणाऱ्यांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर लिबर्टी सिक्यूर ट्रॅव्हल नावाने एक विमा उत्पादन लाँच केले आहे. फ्लिपकार्टच्या फ्लाइट बुकिंग प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना एक ठराविक रक्कम भरून झिरो कँसिलेशन ऑफरचा लाभ घेऊ मिळेल. या ऑफरचा फायदा एखाद्या कारणामुळे प्रवासाचे तिकिट रद्द करणाऱ्या प्रवाशांना होईल. लिबर्टीच्या या नवीन ऑफरमुळे ग्राहकांना तिकिट रद्द करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

लिबर्टी सिक्यूर ट्रॅव्हल अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही कारणामुळे तिकिट रद्द करण्याची सुविधा मिळेल. हे कारण मेडिकल, प्लॅनमध्ये बदल, वचनबद्धता किंवा अन्य कोणतेही असू शकते. या पॉलिसी अंतर्गत ग्राहक आपल्या प्रवासाच्या 24 तास आधी आपले तिकिट रद्द करू शकतात. लिबर्टी ग्राहकांच्या नुकसानीचे 5 हजार रुपये देईल.

याबाबत कंपनीचे सीईओ रुपम आस्थाना यांनी सांगितले की, भारतीय ग्राहकांना सूट मिळेल. त्यांना तिकिट रद्द करण्याआधी रिफंडची चिंता करावी लागणार नाही. कंपनी जास्तीत जास्त 5 हजार रुपये ट्रिप कॅसिलेशन चार्ज देईल. तर अपघाती विम्याची रक्कम 5 लाख रुपये असेल. हा विमा 3 महिन्याच्या बाळापासून ते 70 वर्षांच्या वृद्धापर्यंत लागू असेल. हा विमा केवळ देशांतर्गत प्रवासासाठी असले.