कंगना राणावतचा संजय राऊतांवर धमकी दिल्याचा आरोप


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरुन वारंवारवर भाष्य करुन चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटत, असल्याचे म्हणत मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. महाराष्ट्र पोलिसांबद्दल कंगनाने केलेल्या टीकेवरून कंगनाला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलेच झापले होते. त्याचबरोबर तिला जर मुंबईत ऐवढीच भीती वाटत असेल, तर तिने खुशाल जावे आणि परत येऊ नये, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता संजय राऊत यांच्या त्या सल्ल्याला कंगनाने प्रत्युत्तर दिले आहे.

मला शिवसेना नेते संजय राऊत यांनी धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये, असे म्हटले. यापूर्वी स्वातंत्र्याच्या घोषणा मुंबईच्या रस्त्यांवर देण्यात आल्या. आता त्याच मुंबईत उघडपणे धमक्या मिळत असून ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे? असे कंगना म्हणाली.