हे गेम्स भासू देणार नाहीत पबजीची कमतरता

भारत सरकारने पुन्हा एकदा चीनवर कारवाई करत 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली. यामध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले गेमिंग अ‍ॅप पबजीचा देखील समावेश आहे. भारतात पबजी गेम खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र आता पबजी गेम बंद झाल्याने युजर्स या गेमचा पर्याय शोधत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गेम्स सांगणार आहोत, ज्या तुम्ही पबजीचा पर्याय म्हणून खेळू शकता.

Image Credited – Epic Games Store

फोर्टनाईट गेम –

फोर्टनाईट गेम पबजी सारखीच आहे. या गेममध्ये तुम्हाला पबजीप्रमाणेच गनपासून ते कारपर्यंत अनेक गोष्टी मिळतात. याशिवाय या मोबाईल गेममध्ये तुम्हाला वेगवेगळे मॅपची सुविधा मिळेल. या गेमला आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी डाउनलोड केले असून, प्ले स्टोरवर याला 4.4 रेटिंग मिळालेली आहे.

Image Credited – CNet

कॉल ऑफ ड्यूटी : मोबाईल –

कॉल ऑफ ड्यूटी सर्वात लोकप्रिय गेम पैकी एक आहे. या गेममध्ये देखील पबजी आणि फोर्टनाइटप्रमाणे बंदूक मिळेल. ग्राफिक्सच्या बाबतीत या गेमला तोड नाही. या गेमला आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी डाउनलोड केले आहे. गुगल प्ले स्टोरवर या गेमला 4.5 रेटिंग आहे.

Image Credited – Pocket Gamer.biz

गरेना फ्री फायर –

गरेना फ्री फायर गेम पबजीशी मिळती जुळती आहे. ग्राफिक्सच्या बाबतीत ही गेम ठीकठाक आहे. मात्र यात देखील तुम्हाला मॅप आणि बंदूक मिळेल. या गेमला प्ले स्टोरवर 4.1 रेटिंग असून, 50 लाखांपेक्षा अधिक जणांनी गेमला डाउनलोड केलेले आहे.

Image Credited – YouTube

नाईव्हज आउट –

नाईव्हज आउट या गेमला 2017 साली लाँच करण्यात आले होते. गेमचे ग्राफिक्स देखील चांगले आहेत. एकाच वेळी 100 प्लेयर्स ही गेम खेळू शकतात. या गेमची साइज 80 एमबी असून, प्ले स्टोरवरील रेटिंग 3.4 आहे.