अखेर फेसबुककडून भाजपच्या या नेत्याचे फेसबुक-इंस्टाग्राम अकाऊंट बंद


नवी दिल्ली – देशातील विरोधी पक्षांकडून फेसबुकवर द्वेषयुक्त भाषणास प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात असतानाच फेसबुकने आज भाजप नेते टी राजा सिंग यांच्यावर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरुन हिंसाचार आणि द्वेषाला प्रोत्साहन देणार्‍या सामग्रीवरील धोरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी घातली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार फेसबुकने भाजपच्या धोरणांचे समर्थन करत आहेत आणि भाजप नेते टी राजा सिंग यांची भडकाऊ वक्तव्य फेसबुक त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन डिलीट केली जात नाहीत. या वृत्ताचा हवाला देत काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.

फेसबुकच्या प्रवक्त्याने ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल आम्ही राजा सिंग यांचे फेसबुक अकाऊंट बंद केले आहे. फेसबुकद्वारे आमच्या व्यासपीठावर हिंसाचार, द्वेषबुद्धीस उत्तेजन देणे किंवा द्वेषबुद्धीस प्रतिबंध करण्यास आमचे धोरण प्रतिबंधित करते. संभाव्य उल्लंघन करणार्‍यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक असून या प्रक्रियेवर काम करीत असताना आम्ही राजा सिंग यांचे अकाऊंट फेसबुकवरून बंद करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.