आधुनिक रामानुजन! कधीही शाळेत न गेलेला हा पठ्या चुटकीसरशी सोडवतो अवघड गणिते

गणित हा असा विषय आहे जो सर्वांनाच आवडेल याची शक्यता फारच कमी. अनेकदा पदवीचे शिक्षण घेतले तरी गणिताची आकडेवारी काहींना समजत नाही. मात्र ज्याला समजले त्याचासाठी सर्वकाही सहज सोपे असते. अशाच एका राजस्थानमधील मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाचे नाव इरफान असून, तो अशिक्षित आहे. मात्र तो गणिताचे अवघड प्रश्न अगदी सेंकदात सोडवतो की आपल्याला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही.

(सौजन्य – आजतक)

टेड्डी नावाच्या एका ट्विटर युजरने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मुलावर आज तकने देखील मागील वर्षी बातमी केली होती. मात्र आता पुन्हा एकदा इरफानचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये व्यक्ती त्याला विचारतो की, जर कोणी 12 वर्षांचे असेल तर तो किती दिवसांचा झाला ? यावर अवघ्या सेंकदात इरफान 4,380 असे उत्तर देतो. यानंतर व्यक्तीला त्याला आणखी काही प्रश्न विचारतो व इरफान त्या प्रश्नाची उत्तरे देखील चुटकीसरशी देतो.

इरफानचे वय 20 वर्ष आहे. तो राजस्थानच्या दूदू येथे राहतो. त्याचे आई-वडील रोंजदारीवर काम करतात. लोक त्याला चालता-फिरता कॅलक्यूलेटर म्हणतात. त्याच्या आजीने सांगितले की, त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो शिकला नाही. एकदा आजारी पडल्यानंतर त्याच्या मेंदूचे ऑपरेशन करण्यात आले होते. तेव्हापासूनच त्याचे गणित एवढे पक्के झाले.

आता पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर नेटकरी या अशिक्षित तरुणाच्या बुद्धीचे भरभरून कौतुक करत आहेत.