नेटफ्लिक्सच्या या नव्या सुविधेमुळे तुम्ही विनामूल्य पाहू शकता ओरिजनल सिरीज आणि चित्रपट


आता तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर मोफत ओरिजिनल सिरीज आणि चित्रपटांचा लाभ घेऊ शकता. नेटफ्लिक्स आपल्या युजर्सला सध्या अनेक ओरिजिनल सिरीज आणि चित्रपट मोफत पाहण्याची सेवा प्रदान करत आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर नवीन मेंबर्स जोडण्यासाठी कंपनी ही ऑफर घेऊन आली आहे.

नेटफ्लिक्सवरील मोफत चित्रपटांमध्ये स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things), मर्डर मिस्ट्री (Murder Mystery), एलिट (Élite), बॉस बेबीः बॅक इन बिजनेस (Boss Baby: Back in Business), बर्ड बॉक्स (Bird Box), व्हेन दे सी अस (When They See Us), लव्ह इज ब्लाइंड (Love Is Blind), द टू पोप्स (The Two Popes), आवर प्लॅनेट (Our Planet) आणि ग्रीक अॅण्ड फ्रेन्की (Grace and Frankie) इत्यादींचा समावेश आहे. युजर्स सर्व भाषांमधील चित्रपट कंपनीच्या या ऑफर अंतर्गत पाहू शकतील. दरम्यान कोणत्याही ओरिजिनल सिरीजचा पहिला सीझनचा पहिला एपिसोड तुम्हाला पाहता येईल. यासाठी नेटफ्लिक्सचे अकाउंट असणे आवश्यक नाही. सध्या नेटफ्लिक्सची सबस्क्रिप्शन प्लॅन 199 ते 799 रुपयांच्या दरम्यान आहे.

जागतिक स्तरावर कंपनीची ही ऑफर असून याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला netflix.com/watch-free लिंकवर जावे लागेल. ही ऑफर ब्राउजर आणि कॉम्प्युटरसह विंडोज पीसी, मॅक, अँड्रॉइड डिव्हायसेस, स्मार्ट टीव्ही आणि फायर स्टिकवर उपलब्ध आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देखील नेटफ्लिक्सने आपल्या काही ओरिजिनल्सच्या पहिल्या भागाचे विनामूल्य अॅक्सेस भारतात उपलब्ध करुन दिले होते. केवळ नेटफ्लिक्सच नाही तर यूट्यूबवर देखील मोफत सेवा देते.