व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला मिळणार रिंगटोनपासून ते स्टोरेजपर्यंत हे नवीन फीचर

आपल्या युजर्सला नवीन अनुभव देण्यासाठी इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर असते. व्हॉट्सअ‍ॅप आणखी काही नवीन फीचरवर काम करत असून, यामध्ये अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक, नवीन वॉलपेपर, रिंगटोन आणि स्टोरेज यूसेज फीचरचा समावेश आहे. सध्या यातील काही फीचर्स केवळ बीटा यूजर्ससाठीच उपलब्ध आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनला ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅप स्टोरेज ऑप्टिमायझेशनसह अनेक नवीन फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कॉलसाठी नवीन रिंगटोन ठेवण्यात येईल, या फीचरवर काम करत असल्याचे सांगण्यात आले होते. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरमुळे तुम्हाला फोनव्यतिरिक्त ग्रुप कॉलिंगसाठी वेगळी रिंगटोन ठेवता येईल.

युजर्सला वेगवेगळ्या चॅटसाठी वेगळे वॉलपेपर देखील ठेवता येणार आहे. याशिवाय युजर्सला आता व्हॉट्सअ‍ॅप मीडिया स्टोरेजचा कसा वापर करत आहे, ते देखील पाहू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने युजर्स वापरत नसलेल्या फाईल्सला डिलीट करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन डेटा आणि स्टोरेज सेटिंग्ससाठी एक नवीन इंटरफेस देणार आहे.

स्टोरेजच्या फीचरमुळे युजर्सला मीडिया फाईल डिलीट करणे सोपे होणार आहे. या सेक्शनमध्ये फॉर्वर्ड केलेल्या फाईल्स देखील दिसतील.