बोंबला…! 27 टक्क्यांनी महागणार मोबाईलवर बोलणे

मोबाईल युजर्ससाठी टेलिकॉम सेवा कमीत कमी 10 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. पुढील 7 महिन्यात एअरटेल आणि व्होडाफोनला एजीआरच्या रक्कमेच्या 10 टक्के रक्कम द्यायची आहे. दूरसंचार कंपन्यांनी एजीआरच्या उर्वरित रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत फेडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मार्च 2021 पर्यंत एअरटेलला 2600 कोटी आणि व्होडाफोन-आयडियाला 5000 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे एअरटेल आपले उत्पन्न प्रति यूजर 10 टक्के आणि व्होडाफोन 27 टक्क्यांनी वाढवू शकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एअरटेलचे प्रती यूजर सरासरी उत्पन्न 157 रुपये आणि व्होडा-आयडियाचे 114 रुपये होते. येणाऱ्या काळात कंपन्या टॅरिफला 10 टक्क्यांनी वाढवू शकते.

उद्योजक आणि टीएमटी सल्लागार संजय कपूर म्हणाले की, स्पेक्ट्रम कॉस्ट आणि दुसऱ्या गुंतवणुकीला वेगळे ठेवले तरी सर्व्हिस प्रोव्हाइडर्सला युजर्सची मागणी पुर्ण करण्यासाठी कमीत कमी 3-4 डॉलर प्रती यूजर उत्पन्नाची गरज पडेल. त्यामुळे पुढील तिमाहीपर्यंत टॅरिफ रेटमध्ये वाढ होईल.