आकाशातून तुमच्या दारात अचानक लाखो रुपये किंमतीची वस्तू कोसळली तर ? तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे. आकाशातून लाखो रुपये किंमतीची कोणती वस्तू व का पडेल ? हा तुमचा सर्वात प्रथम प्रश्न असेल. मात्र ब्राझीलमधील एका शहरात असे घडले आहे व ही घटना पाहून तेथील नागरिक देखील हैराण झाले. ईशान्य ब्राझीलमधील दुर्गम शहर असलेल्या सांता फिलोमेना येथे आकाशातून चक्क उल्क पिंड कोसळले आहे. विशेष म्हणजे या दगडांची किंमत तब्बल 26 हजार डॉलर्स (जवळपास 19 लाख रुपये) आहे.
चमत्कारच! आकाशातून झाला दगडांचा वर्षाव आणि एका रात्रीत लखपती झाले हे गाव
हा दगड 4.6 बिलियन वर्ष जुन्या उल्काचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या सोलर सिस्टमचा हा भाग आहे. खास गोष्ट म्हणजे यासारखे माहिती असलेले आणि अभ्यासलेले केवळ 1 टक्के उल्का आहेत. या आकाशीय दगडामुळे ब्राझीलच्या सांता फिलोमेना गावातील शेतकरी एका रात्रीत लखपती झाले आहेत. यातील एक दगड जवळपास 40 किलोचा असून, याची किंमत 26 हजार डॉलर्स आहे.
आकाशातून दगडांचा वर्षाव होतोना पाहणारे कोस्टा रॉड्रिग्स म्हणाले की, या शहरातील 90 टक्के लोकसंख्या शेतकरी आहे. येथे जास्त दुकाने देखील नाहीत व नोकरी देखील मिळत नाही. कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांचे एक चांगले ठिकाण आहे. अनेकांना दगड मिळाला आहे. हा दगड आशा वेळी आला आहे, जेव्हा अनेकांना बिल भरण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे.
कलेक्टर्स आणि संशोधक या दगडांमध्ये रस दाखवत आहेत. त्यामुळे याची किंमत देखील झपाट्याने वाढत आहे. परदेशी नागरिक देखील हा दुर्मिळ दगड खरेदी करण्याची इच्छा दर्शवत आहेत.