राहुल गांधींनी वाचला पंतप्रधान मोदी निर्मित आपत्तींचा पाढा, म्हणाले…

देशातील कोरोनाग्रस्तांचा दिवसेंदिवस वाढत चाललेला आकडा आणि मागील अनेक दशकानंतर तब्बल -23.9 टक्क्यांनी घसरलेला जीडीपीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची भयावह स्थित दर्शवत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान मोदीनिर्मिती आपत्तींमुळे भारत या संकटात अडकला असल्याची टीका त्यांनी केली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, घसरलेला जीडीपी दर, चीनीची घुसखोरी यावरून टीका करताना त्यांनी काही मुद्यांचा पाढाच वाचला आहे.

राहुल गांधींनी ट्विट केले की, भारत मोदी निर्मिती आपत्तींमध्ये अडकलेला आहे. 1. ऐतिहासिक -23.9 आक्रसलेला जीडीपीचा दर,2.  45 वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी, 3. 12 कोटी लोकांनी रोजगार गमावला, 4. सरकार राज्यांनी त्यांची जीएसटीची थकबाकी न देणे, 5. जगात दिवसाला सर्वाधिक कोराना रुग्ण आणि मृतांची संख्या, 6. सीमेवर तणावाची स्थिती.

याआधी देखील राहुल गांधींनी ट्विट करत नोटबंदी, दोषपुर्ण जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन ही 3 कारणे अर्थव्यवस्था उध्वस्त करण्यास कारणीभूत असल्याची टीका केली होती.