वेगाने अण्वस्त्र साठा दुप्पट करत आहे चीन, अमेरिकेचा दावा

मागील काही महिन्यांपासून चीनचे अनेक देशांसोबत तणावाचे संबंध निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर चीन आपला अण्वस्त्र साठा वेगाने दुप्पट करण्याची योजना बनवत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालया पेंटागनने आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या दशकाच्या अखेरपर्यंत चीन आपली अणवस्त्र क्षमता दुप्पट करेल. चीन या दरम्यान आपल्या ताफ्यात अण्वस्त्र घेऊन जाण्यास सक्षम बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा देखील समावेश खरेल. हे क्षेपणास्त्र अमेरिकेपर्यंत मारा करण्यास सक्षम असेल.

चीन मिलिट्री पॉवर नावाने असलेल्या या रिपोर्टमध्ये पेंटागनने म्हटले की, चीनचा अण्वस्त्रांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याचा उद्देश जागतिक स्तरावर मजबूत स्थिती निर्माण करणे हा आहे. चीन आशिया प्रशांत क्षेत्रात एक प्रमुख शक्ती बनण्यासह 2049 पर्यंत अमेरिकेच्या बरोबर अथवा अधिक अण्वस्त्र शक्ती वाढविण्यासाठी कार्य करत आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, या दशकात चीन जमीन, हवा आणि पाण्यातून अण्वस्त्र हल्ला करण्याची आपल्या साधनांची संख्या वाढवेल. चीनची अण्वस्त्र संख्या दुप्पट झाली तरी अमेरिकेपेक्षा कमीच असेल.