पाकिस्तानने आपल्या देशात 5 डेटिंग अॅप्सवर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे. या अॅप्समध्ये लोकप्रिय टिंडर, टॅग्ड, स्काउट, ग्राइंडर आणि से हायचा समावेश आहे.
… म्हणून पाकिस्तानने या 5 डेटिंग अॅप्सवर घातली बंदी
पाकिस्तान टेलिकॉम नियामक संस्था असलेल्या पाकिस्तान टेलिकम्यूनिकेशन अथॉरिटीने (पीटीए) याबाबत माहिती देताना सांगितले की, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सला कथितरित्या अनैतिक काँटेट दर्शवत होते. वारंवार चेतावणी दिल्यानंतर देखील या अॅप्सने आपल्या प्लॅटफॉर्मवरील कंटेट हटवला नाही.
बंदी घातलेले अॅप्स ऑनलाईन डेटिंगची सुविधा देतात व व्हिडीओ देखील लाईव्ह स्ट्रिमिंग करतात. या अॅप्सवर आरोप आहे की लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान अश्लील काँटेट दाखवला जात होता. पीटीएने माहिती दिली की या अॅप्सला डेटिंग सेवा हटविण्यासाठी आणि लाईव्ह स्ट्रिमिंगची देखरेख पाकिस्तानच्या स्थानिक नियमांनुसार करण्यात यावी असे सांगितले होते. मात्र त्यांनी या नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
पीटीएने सांगितले की, या कंपन्यांनी पाकिस्तानच्या कायद्याचे पालन केले आणि अश्लील सामग्री काढून टाकल्यास त्यावरील बंदीचा पुन्हा विचार केला जाईल.