‘या’ कलाकारांनी ड्रग चाचणी करावी, कंगणाची मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता ड्रग एंगल समोर आला आहे. बॉलिवूडमध्ये देखील यावरून वाद सुरू झाला असून, बॉलिवूड पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा वापर होत असल्याचे आरोप केले जात आहे.

सुशांत प्रकरणात पहिल्या दिवसांपासून सातत्याने बॉलिवूडमधील काही कलाकारांवर सातत्याने टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावतने बॉलिवूडमध्ये ड्रगचे मोठे रॅकेट असल्याचे म्हटले आहे. यासोबतच तिने ट्विट करत बॉलिवूडमधील काही कलाकारांनी ड्रग चाचणी देखील करावी अशी मागणी केली आहे.

कंगणाने ट्विट केले की, मी रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विक्की कौशल यांना ड्रग चाचणीसाठी रक्ताचे नमुने द्यावे अशी विनंती करते. अशी अफवा आहे की या सर्वांना कोकेनचे व्यसन आहे. जर त्यांची टेस्ट क्लिन आल्यास हे सर्व लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरू शकतात. सोबतच कंगणाने पीएमओला देखील टॅग केले.

याआधी देखील कंगणाने ट्विट करत म्हटले होते की, बॉलिवूडमधील कलाकारांची ड्रग चाचणी केल्यास अनेकजण जेलमध्ये असतील.