राफेलला पक्ष्यांपासून धोका, हवाई दलाने हरियाणा सरकारला लिहिले पत्र

अंबाला एअरफोर्स स्टेशनवर तैनात एअरक्राफ्ट्सला पक्ष्यांपासून धोका आहे. याबाबत एअर मार्शल महेंद्र सिंह यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, एअरफोर्स स्टेशनच्या आजुबाजूला पक्ष्यांची संख्या मोठी आहे. ज्यामुळे एअरक्राफ्ट्सला धोका निर्माण होऊ शकतो. खासकरून लढाऊ विमानाला धोका निर्माण होऊ शकतो. यामागचे कारण भागातील कचरा असल्याचे सांगितले आहे.

एअर मार्शल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, एअरफिल्डपासून लहान-मोठ्या पक्ष्यांना लांब ठेवले पाहिजे. यामुळे या भागातील कचरा हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी. घाण पसरवल्यावर दंड आकारावा आणि आयएएफ बेसच्या आजुबाजूच्या परिसरात कबूतरांची संख्या कमी करता येईल.

त्यांनी लिहिले की, अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात पक्षी असतात. त्यामुळे एअरक्राफ्टला पक्ष्याची धडक झाल्यास मोठी घटना घडू शकते.  दरम्यान, अंबाला एअरफोर्स स्टेशनवरच 5 राफेल लढाऊ विमान तैनात करण्यात आलेली आहेत.

Loading RSS Feed