संशोधकांचा दावा, मधमाश्यांच्या विषाने वेगाने नष्ट होतात कॅन्सरच्या पेशी

मधमाश्यांमध्ये आढळणाऱ्या विषाद्वारे धोकादायक ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार करता येणे शक्य असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. एका संशोधनात समोर आले की, मधमाश्यांमधील विष अग्रेसिव्ह ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशांनी कमी वेळात नष्ट करते व अन्य निरोगी पेशींना खूप कमी नुकसान पोहचवते.

हॅरी परकिन्स इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च अँड द यूनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी यासंदर्भात अभ्यास केला आहे. संशोधकांनी कॅन्सरच्या पेशींवर 312 मधमाश्यांच्या विषाचा अभ्यास केला. कॅन्सरच्या उपचारावर हे संशोधन महत्त्वाचे समजले जात आहे. डॉ. सिआरा डफी यांनी अभ्यासासाठी ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या मधमाश्यांचा उपयोग ट्रिपल नेगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर सेल्वर केला.

डॉ. डफी यांच्यानुसार, विषाच्या एका खास मात्रेमुळे कॅन्सरच्या पेशी पुर्णपणे नष्ट होतात. विषात आढळणारे मेलिट्टीन देखील कॅन्सर पेशींच्या विकासाला रोखण्यास प्रभावी ठरले. याआधी कोणीही कॅन्सर पेशींवर मधमाश्यांच्या विषाचा प्रयोग केला नव्हता. विषात आढळणाऱ्या मेलिट्टीनला सिंथेटिकरित्या देखील तयार करणे शक्य आहे.

डॉ. डफी यांनी हे देखील म्हटले की, सध्याच्या किमोथेरेपीसह मेलिट्टीनचा उपयोग करणे शक्य आहे.  

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही