गुगल आपला प्ले स्टोर सुरक्षित प्लॅटफॉर्म बनविण्यासाठी वारंवार बनावट अॅप्सला हटवत आहे. गुगलने बनावट अॅप्सला शोधण्यासाठी अनेक सुरक्षा कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर व्हाइट ऑप्स सटोरी थ्रेट इंटेलिजेंस अँड रिसर्च टीमने 65 हजार फोनवर टेराकोट्टा जाहिरात दाखवण्याच्या प्रकरणात 5 हजार बनावट अॅप्स शोधले आहे.
गुगलने प्ले स्टोरवरून हटवले तब्बल 5,000 बनावट अॅप्स
इंस्टॉल करण्यासाठी हे अॅप्स ग्राहकांना मोफत स्बस्क्रिप्शन, वस्तूंवर डिस्काउंट, कॉन्सर्ट तिकिट आणि अन्य मोफत गिफ्ट देण्याची ऑफर देतात, जे बेकायदेशीर आहे. याशिवाय हे अॅप्स युजर्सची फसवणूक करतात. युजर्स या बनावट अॅप्सला इंस्टॉल केल्यानंतर सर्वात प्रथम एपीके कोडमध्ये बदल करतात. या कारणामुळे अॅप्स स्मार्टफोनच्या सिक्युरिटीपासून वाचतात.
या बनावट अॅप्सने केवळ जून महिन्यात व्ह्यू इंप्रेशनद्वारे पैसे कमविण्यासाठी तब्बल 200 कोटींच्या जाहिराती दाखवल्या आहेत. या फसवणूक करणाऱ्या अॅप्सची माहिती व्हाइट ऑप्स टीमने गुगल दिल्यानंतर 5 हजार अॅप्सला त्वरित प्ले स्टोरवरून हटविण्यात आले आहे. गुगल यासारख्या अॅप्सविरोधात कारवाई करण्यासाठी आपली पॉलिसी अधिक कठोर करणार असल्याचे सांगितले जाते.