मुलीच्या लग्नासाठी वाचवलेले पैसे पुरात भिजले, रस्त्यावर सुकवण्याची आली या कुटुंबावर वेळ

राज्यातील पुर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा येथील एका कुटुंबाचे देखील यात मोठे नुकसान झाले. या कामगार कुटुंबाने मुलीच्या लग्नासाठी एकएक पैसा जमवून केलेली बचत पाण्यात भिजली. पुढील महिन्यात मुलीचे लग्न करायचे होते. आता वाचलेले पैसे हे कुटुंब रस्त्यावर सुकवत आहे. जेणेकरून मुलीचे लग्न पार पडेल. यासंदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

पैशांव्यतिरिक्त लग्नासाठी जमवलेले इतर सामान देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यामुळे हे कुटुंब चारही बाजूंनी संकटात अडकले आहे. वैनगंगा नदीला पूर आल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. काही भागात पुराचे पाणी कमी झाले आहे. हजारो लोकांची घरे या पाण्यामुळे उध्वस्त झाली आहेत.

1994 नंतर पहिल्यांदाच अशी स्थिती निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यातील जवळपास 18 हजार लोक पुरामुळे प्रभावित झाली आहेत. नागरिकांना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरग्रस्त भागात एनडीआरएफच्या टीम मदत कार्य करत आहेत.