शिक्कामोर्तब; गायक-संगीतकार अनू मलिकची होणार ‘बिग बॉस’मध्ये एंट्री


अलीकडेच ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोच्या 14 व्या पर्वाचा प्रमोशनल व्हिडिओ अभिनेता सलमान खानने रिलीज केल्यानंतर या शोच्या चाहत्यांमध्ये शोबद्दलची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. त्याचबरोबर कोणकोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून यंदाच्या पर्वात सहभागी होतील, हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक आतुर झाले आहेत.

यादरम्यान आतापर्यंत बरीच नावे समोर आली आहेत, पण सुत्रांच्या माहितीनुसार, सेलिब्रिटींची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून अशा स्पर्धकांची निवड निर्मात्यांनी केली आहे ज्यांचा आधीच ‘बिग बॉस’शी काहीतरी संबंध राहिला आहे किंवा त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे यावर्षी चर्चा एकवटली आहे.

दरम्यान यंदा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणा-या दोन सेलिब्रिटींची नावे समोर आली आहे. पहिले नाव गायक-संगीतकार अनू मलिक यांचे तर दुसरे नाव टीव्ही अभिनेता आमिर अलीचे आहे. एकीकडे मी टू आरोपांमुळे अनू मलिक चर्चेत राहिले तर दुसरीकडे पत्नी संजिदा शेखसोबतच्या नात्यात आमिर अलीचा दुरावा आल्याचे म्हटले गेले होते. वेगवेगळ्या कारणांमुळे या दोन्ही सेलिब्रिटींनी भरपूर चर्चा एकवटली होती. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांना अप्रोच केले होते. या शोसाठी दोघांनीही आपला होकार निर्मात्यांना कळवला आहे. अनू मलिक यांचा धाकटा भाऊ अबू मलिक गेल्या वर्षी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

या शोमध्ये सहभागी होणा-या सेलिब्रिटींमध्ये नैना सिंह, पवित्रा पुनिया, जास्मीन भसीन, नेहा शर्मा, विव्हियन डिसेना, जान खान, शगुन पांडे, स्नेहा उल्लाल, डोनल बिष्ट, आलिशा पंवर, आकांक्षा पुरी ही नावे आतापर्यंत समोर आली आहेत. तथापि, निर्मात्यांनी अधिकृतपणे या नावांची पुष्टी केली नाही. यंदा ‘बिग बॉस’ घरात प्रवेश करण्यापूर्वी सर्व स्पर्धकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेस्ट केली जाईल. याशिवाय कोरोनापासून संरक्षणाच्या सर्व सुविधा घरात उपलब्ध असतील. यावर्षी शोमध्ये 16 स्पर्धक दिसणार आहेत, यामध्ये 13 सेलिब्रिटी आणि 3 सामान्य लोकांचा समावेश असणार आहे.