लेकीसाठी देश सोडण्याचा काजोलने घेतला निर्णय


आपल्या अतरंगी आणि हटके फोटोमुळे सोशल मीडियात अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा नेहमीच चर्चेत असते. त्यातच आता काजोल आपल्या मुलीसाठी देशा सोडण्याचा निर्णय अभिनेत्री काजोलने घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार काजोल मुलीसोबत सिंगापूरमध्ये राहणार असल्याची चर्चा आहे. तर मुलगा युगसोबत अजय देवगण मुंबईत राहणार आहे.

सिंगापूरमध्ये न्यासा शिक्षण घेते असून कोणताही परिणाम न्यासाच्या अभ्यासावर होऊ नये अशी काजोल आणि अजयची इच्छा आहे. काजोल आणि अजय कोरोनामुळे न्यासाला सिंगापूरमध्ये एकटे राहू द्यायला तयार नसल्यामुळे आता न्यासासोबत सिंगापूरमध्ये काजोल राहणार आहे. काजोल पुढचे काही महिने न्यासासोबत राहणार आहे. अजय देवगणने सिंगापूरमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केला आहे, जेणेकरुन काजोल आणि न्यासाला राहण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये. मुलगा युगसोबत अजय देवगण मुंबईत राहणार आहे.