भररस्त्यात महिलांचा तुफान डान्स, व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगात जोश संचारेल

सोशल मीडियावर सध्या एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिला कोणाचीही पर्वा न करता भररस्त्यात आनंदात ‘पिया तू अब तो आ जा’ या गाण्यावर बिंधास्त नाचत आहेत.

15 सेंकदांच्या या व्हिडीओला ट्विटर हँडल @peechetodekho ने शेअर केले असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या वृद्ध महिला आणि एक व्यक्ती आशा भोसले यांनी 1971 मध्ये गायलेल्या ‘पिया तू अब तो आ जा’ गाण्यावर नाचत आहे. बाजूला बसलेली लहान मुले देखील त्यांना पाहून हसत आहे.

सोशल मीडियावर युजर्स या महिलांच्या उत्साहाचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत 33 हजारांपेक्षा अधिक जणांनी बघितले असून, अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, ज्या गाण्यावर महिला डान्स करत आहेत त्या गाण्याला संगीतकार आरडी बर्मन यांनी कंपोज केले आहे. हे गाणे कारवां चित्रपटातील असून, या गाण्यावर हेलन यांनी नृत्यू केले आहे.