गलवान खोऱ्यात भारताने शिकवला होता चीनला धडा, समोर आला पुरावा

सध्या भारत-चीनमध्ये सीमावादावरून तणावाच्या स्थिती आहे. काही महिन्यांपुर्वी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे 20 जवान देखील शहीद झाले होते. त्यावेळी किती चिनी सैनिक मारले गेले याची ठोस माहिती आणि पुरावा समोर आला नव्हता. मात्र आता या संघर्षात भारतीय सैन्याने चीनला चांगलाच धडा शिकवल्याचा पुरावा समोर आला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार चीनमधील सोशल मीडिया साइट विबोवर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चीनी सैनिकांचे थडगे बनवलेले दिसत आहे. विबोवरील दोन अकाउंट्सवर दावा केला जात आहे की चीनी सैनिक चेन जियांगरोंगचा मृत्यू गलवान खोऱ्यातील झडप दरम्यान झाला. या सैनिकाचे थडगे बनविण्यात आले आहे. या थडग्याच्या दगडावर लिहिले आहे की, फुजियानच्या पिंगनानचा 69316 तुकडीचा सैनिक. हे चेन जियांगरोंगचे थडगे आहे.

Image Credited – Aajtak

चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनद्वारे लावण्यात आलेल्या या दगडावर चेन जियांगरोंगला श्रद्धांजली देण्यात आलेली आहे. याबाबत अद्याप चीनच्या सरकारकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक प्रश्न विचारू लागले आहेत.

हे थडगे 5 ऑगस्ट 2020 ला दक्षिण शिनजियांग मिलिट्री क्षेत्रात बनवलेले आहे. यात लिहिले आहे की मृत्यू झालेला 19 वर्षांचा होता. त्याचा जन्म डिसेंबर 2001 ला झाला होता. पिपल्स लिबरेशन आर्मीच्या स्ट्रक्चरनुसार 69316 यूनिट दक्षिण मिलिट्री क्षेत्रातील 13व्या रेजिमेंटचा भाग आहे.