वैज्ञानिकांचा इशारा, कोरोना लसीचा एक डोस ठरणार नाही प्रभावी

जगभरात कोरोना व्हायरसवरील लस शोधण्याचे काम सुरू आहे. यातच आता अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, लसच्या निर्मितीनंतर केवळ एक डोस परिणामकारक ठरणार नाही. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की कमीत कमी 2 डोसची आवश्यकता भासू शकते. सध्या कोरोना संकटाच्या काळात आवश्यक अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. अशात दोन वेळा लसीकरण करणे जगासमोर मोठे आवाहन असणार आहे.

वँडरबिल्ट यूनिव्हर्सिटीचे हेल्थ पॉलिसीचे प्रोफेसर डॉ. केली मूर म्हणाले की, हे सर्वात मोठे आव्हान म्हणून समोर येईल. मानवी इतिहासातील हे सर्वात मोठे लसीकरण असेल व हे पुर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल. आपण आतापर्यंत एवढ्या मोठ्या स्तरावर प्रोग्राम चालवलेला नाही.

अमेरिकेत कोरोना व्हायरसला बाजारात आणण्यासाठी ऑपरेशन वार्प स्पीड चालवले जात आहे. याअंतर्गत 6 फार्मास्यूटिकल कंपन्यांना निधी देण्यात आलेला आहे. यातील मोडर्ना आणि फाइजर या कंपन्यांच्या लसी तिसऱ्या टप्प्यात आहेत. याशिवाय अन्य काही कंपन्या देखील लस निर्मितीच्या शर्यतीत आहेत.