महाराष्ट्रात अनलॉक-4 ची नियमावली जाहीर, ई-पासची सक्ती रद्द

राज्य सरकारने मिशन बिग‍िन अगेन अंतर्गत 1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अनलॉक-4 साठी नियमावली जारी केली आहे. नवीन नियमांतर्गत राज्यात हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी मानक संचालन प्रक्रियेचे (एसओपी) पालन करावे लागेल. ऑफिस 30 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

याशिवाय आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी सध्या परवानगी देण्यात आलेली नाही. शाळा-कॉलेज, शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस 30 सप्टेंबरपर्यंतच बंद राहतील. ऑनलाईन क्लासेस सुरू राहतील व त्यालाच प्रोत्साहन दिले जाईल.

आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी असेल. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क्स उघडण्याची सध्या परवानगी नाही. सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमात जास्त लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल.