जिओ फायबरने लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनेक सेवा मोफत

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी जिओ फायबरने आपले सर्वात स्वस्त अनलिमिटेड ब्रॉडबँड प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन प्लॅन अंतर्गत कोणतीही व्यक्ती केवळ 399 रुपयात अनलिमिटेड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतील. सोबतच कंपनी सर्व ग्राहकांना 30 दिवसांचे फ्री ट्रायल देण्याची देखील घोषणा केली आहे.

जिओ फायबरने ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी नए इंडिया का नया जोश अभियानांतर्गत नवीन टॅरिफ प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅनमध्ये महिन्याला 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. यात 30 एमबीपीएसपासून ते 300एमबीपीएस अनलिमिटेड डेटा स्पीड मिळेल.

Image Credited – NDTV

नवीन प्लॅनमध्ये काय काय मिळेल ?

  • अनलिमिटेड इंटरनेटची सुविधा
  • हाय स्पीड इंटरनेट
  • कोणतेही इतर शुल्क नाही
  • टॉप-12 पेड ओटीटी अ‍ॅप्सचे स्बस्क्रिप्शन

फ्री ट्रायलमध्ये काय मिळेल ?

  • जिओने आणलेल्या चारही प्लॅनमध्ये 4के सेट टॉप बॉक्ससह 10 ओटीटी अ‍ॅपचे स्बस्क्रिप्शन मोफत मिळेल.
  • मोफत वॉइस कॉलिंगची सुविधा.
  • कंपनीने म्हटले आहे की ग्राहकांना सेवा न आवडल्या कोणतेही प्रश्न न विचारता शुल्क परत केले जातील.
  • 1 सप्टेंबपासून ही सेवा सुरू होईल.