मला हिमाचल किंवा केंद्र सरकारनेच सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज


बॉलिवुडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास कंगना राणावत तयार आहे. पण, तिला त्यासाठी सुरक्षा देणे गरजेचे आहे. दुर्देव म्हणजे महाराष्ट्र सरकारने १०० तास, ४ दिवस उलटून गेले तरी अजून कंगनाला सुरक्षा पुरवलेली नाही, असे ट्विट करत राम कदम यांनी कंगनाच्या सुरक्षेची मागणी केली होती. त्यांनी या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्तांनाही टॅग केले होते. त्यावर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे.

त्यानतंर राम कदम यांच्या मागणीला उत्तर देताना कंगनाने सर…माझी काळजी घेतली त्याबद्दल धन्यवाद, पण खरंतर आता मला मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी…पण मुंबई पोलीस नको प्लिज…अशा आशयाचे ट्विट केले आहे. कंगनाच्या प्रतिक्रियेनंतर राम कदम यांनी त्यावर रिप्लाय देताना एक व्हिडिओ शेअर करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगना राणावतचे, मला आता मुव्ही माफिया गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते हे विधान महाराष्ट्र सरकारसाठी खणखणीत चपराक असून महाराष्ट्र सरकारने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हस्तक्षेप करुन मुंबई पोलिसांच्या सक्षम प्रतिमेला मलीन केल्याचे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले होते. त्याचबरोबर राम कदम यांनी कंगना राणावत बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्यास तयार आहे, पण तिला त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली होती.